Chandrayaan-4 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Chandrayaan-4 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर यशस्वीरीत्या उतरल्यावर पृथ्वीवर परतण्यात वापरलेले तंत्रज्ञान प्रदर्शित करणे तसेच चंद्रावरून नमुने आणून पृथ्वीवर त्यांचे विश्लेषण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. चांद्रयान-4 मोहीम भारताच्या चंद्रावर उतरण्यासाठी (वर्ष 2040 पर्यंत नियोजित) आणि पृथ्वीवर सुरक्षित परतण्यासाठी मूलभूत तंत्रज्ञान क्षमता प्राप्त करेल. डॉकिंग/अनडॉकिंगलँडिंगपृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरील नमुना संकलन आणि विश्लेषण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.

भारत सरकारने अमृत काळात भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक विस्तारित दृष्टीकोन रेखाटला आहेज्यामध्ये 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक (भारतीय अंतराळ स्थानक) आणि 2040 पर्यंत भारतीय चंद्रावर उतरण्याची संकल्पना आहे. या संकल्पपूर्तीसाठीगगनयान आणि चांद्रयान अनुसरण मोहिमांची मालिका देखील नियोजित करण्यात आली आहेज्यामध्ये संबंधित अंतराळ वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षमतांचा विकास समाविष्ट आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 लँडरच्या सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगच्या यशस्वी प्रात्यक्षिकाने काही प्रमुख तंत्रज्ञान निश्चिती झाली आहे आणि अशा क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले आहे ज्या केवळ ठराविक अन्य देशांकडे आहेत. चंद्राचे नमुने गोळा करण्याची आणि सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता प्रदर्शित केल्याने यशस्वी लँडिंग मोहिमेची पुढील पायरी निश्चित होईल.

अंतराळयानाचा विकास आणि प्रक्षेपण करण्याची जबाबदारी इस्रोची असेल. इस्रो मधील स्थापित यंत्रणांद्वारे प्रकल्पाचे प्रभावीपणे व्यवस्थापन आणि परीक्षण केले जाईल. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहभागाच्या मदतीने ही मोहीम मंजुरीनंतर 36 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सर्व महत्वपूर्ण तंत्रज्ञान स्वदेशी विकसित करण्याची कल्पना आहे. हे मिशन विविध उद्योगांद्वारे राबवण्यात येत आहे आणि अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांमध्ये उच्च रोजगार क्षमता निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक आदर्श बदल घडवून आणणे अपेक्षित आहे.

"चांद्रयान-4" या तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मोहिमेसाठी एकूण 2104.06 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या खर्चामध्ये अंतराळयान तयार करणेएलव्हीएम 3 च्या दोन प्रक्षेपण वाहन मोहिमापृथ्वीबाहेरील गहन अंतराळ नेटवर्कला समर्थन देणे आणि संरचना सत्यापनासाठी विशेष चाचण्या घेणे आणि शेवटी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे आणि चंद्रावरील नमुने गोळा करून पृथ्वीवर परतणे यांचा समावेश आहे .

ही मोहीम भारताला मानवीय मोहिमेसाठीचंद्रावरील नमुने आणण्यासाठी आणि त्या नमुन्यांच्या वैज्ञानिक विश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण मूलभूत तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर बनण्यास सक्षम करेल. हे साकारण्यात भारतीय उद्योगाचीही महत्त्वाची भूमिका असेल. वैज्ञानिक बैठका आणि कार्यशाळांद्वारे भारतीय शैक्षणिक संस्थांना चांद्रयान-4 शी जोडण्यासाठी योजना आधीच तयार आहेत. पृथ्वीवर आणलेल्या नमुन्यांचे जतन आणि विश्लेषणासाठी ही मोहीम चांगल्या सुविधांची खातरजमा करेलजी राष्ट्रीय संपत्ती असेल.

भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर यशस्वीरीत्या उतरल्या...