Q.महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
बरोबर उत्तर
7 नोव्हेंबर
स्पष्टीकरण
महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये (सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता, या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.